Hometech mahitiअण्णासाहेब पाटील लोन योजना 2023 | वाढीव अर्ज मिळणार 15 लाखापर्यंत

अण्णासाहेब पाटील लोन योजना 2023 | वाढीव अर्ज मिळणार 15 लाखापर्यंत

अण्णासाहेब पाटील लोन योजना 2023 | वाढीव अर्ज मिळणार 15 लाखापर्यंत

 

अण्णासाहेब पाटील लोन योजना 2023 | वाढीव अर्ज मिळणार 15 लाखापर्यंत

 

अण्णासाहेब पाटील लोन योजना : नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात ऐकून लोकसंखेच्या बहुतेक जनता आर्थिकदृष्ट्या मागास वर्गात मोडते. राज्यातील या आर्थिकदृष्ट्यामागास वर्गाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे त्याच्या विकासाठी  दिनांक २७/११/१९९८ रोजी  स्थापना केलेली आहे.

राज्यात आर्थिक विकासापासून वंचित अशा वर्गाला विकासाच्या प्रवाहात आणणे  आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार बांधवांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी मिळून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९ ऑगस्ट १९९८ रोजी महत्वाचा निर्णय घेतला व या निर्णयाच्या पार्शभूमीवर राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.

योजनेचे ठळक मुद्दे :

योजनेचे नाव

अण्णासाहेब पाटील लोन योजना 2023

राज्य

महाराष्ट्र

विभाग

  कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभाग

उद्देश्य

व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य्य करणे

लाभ

१० लाख ते ५० लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य्य

लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील नागरिक

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

वेबसाईट

येथे क्लिक करा

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा उद्देश्य

 • महाराष्ट्र राज्यातील तरुण वर्गाला स्वतःच्या व्यवसाय सुरु करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील लोन योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध केले जाते.

 • नवीन उद्योग सुरु करण्यासाठी सक्षम बनवून आर्थिकदृष्ट्या मागास विशेषकरून बेरोजगार तरुणांसाठी आर्थिक मदत करणे.

 •   तसेच सुरु असलेल्या व्यवसायाची ऋद्धी करण्यासाठी मदत करणे.

 • रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी या योजनेतून देणे.

 • आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवणे हे या योजनेचे प्रमुख उद्देश आहे.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी आवश्यक पात्र

 • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.

 • इतर कोणत्याही राज्याचा नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.

 • उमेदवारांसाठी वयोमर्यादा अट ही पुरुषांकरिता कमान 50 वर्षे तर महिलांकरिता कमाल 55 वर्षे आहे

 • बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केलेले आवश्यक आहे.

 • अर्जदार हा 18 वर्ष पूर्ण असला पाहिजे.

 • लाभार्थ्याला एकदाच या योजनेचा लाभ मिळेल.

 • उमेदवाराचे उत्पन्न हे मध्यम प्रकारचे असले पाहिजे.

आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचे लाभ

 • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील इच्छुक तरुणांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच विद्यमान व्यवसायाला चालना देण्यासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

 • महत्वाचे म्हणजे कर्जावरील व्याजाची  जीही परतफेड असेल ती सर्व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ करते.

 • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

 • या योजनेचे महत्व असे की, लाभार्थ्याने कर्जाचे हप्ते वेळेवर दिल्यास  व्याजाची रक्कम (12 टक्के) बँक खात्यात  दरमहा लाभार्थीला दिली जाईल.

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेत येत असलेल्या  बँका

 • श्री.वारणा सहकारी बँक लि.वारणानगर

 • महालक्ष्मी सहकारी सहकारी बँकेचे श्री

 • दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँक लि.सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.सिंधुदुर्ग.

 • देवगिरी नागरी सहकारी बँक, औरंगाबाद

 • कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.

 • श्री.आदिनाथ सहकारी बँक लि.इचलकरंजी

 • सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड

 • लोक विकास नागरी कं बँक लि.औरंगाबाद

 • श्री विरशैव सहकारी बँक मरीया. कोल्हापूर

 • ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे

 • पनवेल को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक मेरी, पनवेल

 • हुतात्मा सहकारी बँक मेरी, कोरडे

 • चिखली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लि. चिखली, बुलढाणा

 • राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ, सांगली

 • राजापूर अर्बन को-ऑप. बँक लि. राजपूर

 • नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लिमिटेड,

 • राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप.बँक लि.कागल

 • चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, चंद्रपूर

 • यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड

 • शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड

 • पलूस सहकारी बँक पलूस

 • रामेश्वर को.ऑप.बँक लिमिटेड

 • लोकमंगल को-ऑप.बँक लिमिटेड सोलापूर

 • प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक

 • अमरावती मर्चंट को-ऑप.बँक लिमिटेड

 • इनोव्हेटिव्ह अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड

 • जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई

 • रेंडल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, रेंडल

 • कुरुंदवाड अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड, कुरुंदवाड

 • श्री अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँक

 • जनता सहकारी बँक अमरावती

 • अरिहंत को-ऑप बँक

 • कराड अर्बन को-ऑप बँक

 • विदर्भ मर्चंट को-ऑप.बँक लिमिटेड, हिंगणघाट

 • दिव्यंकटेश्वर कं. बँक लि. इचलकरंजी

 • सेंट्रल कंपनी ऑप. बँक लि.कोल्हापूर

 • सांगली अर्बन को.-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगली

 • भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक

 • गोदावरी अर्बन बँक

 • श्री नारायण गुरु को. सहकारी बँक लि.

 • श्रीकृष्ण को.ऑप.बँक लि.

 • नागपूर नागरी सहकारी बँक

 • सातार सहकारी बँक

 • दिहस्ती को.ऑप. बँक लि.

 • दि बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती कंपनी बँक म. बुलडाणा

 • अनुराधा अर्बन को-ऑप. बँक लि.

 • जनता सहकारी बँक लि. गोंदिया

 • निशिगंधा सहकारी बँक

 • महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मेरी. लातूर

 • सातारा जिल्हा मध्यवर्ती कं. बँक लि.सातारा

 • येस बँक लिमिटेड (Ves Bank LTD.)

 • रायगड सहकारी बँक लिमिटेड

व्याजाची परतफेड कशी करावी:

• लाभार्थी  6 महिन्यांच्या 7 व्या दिवसापासून कर्ज आणि व्यवसाय कर्ज परतफेड  करणे सुरू करण्यात येईल.

• समूह/बँक  या उक्त आर्थिक सहाय्य अण्णासाहेब पाटील कर्ज (7 वर्ष 84 महिन्यांत परतफेड)वाटप  करतील.

ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

 • मोबाईल नंबर

 •  जात प्रमाणपत्र

 • वयाचा पुरावा

 • आधार कार्ड

 •  पॅन कार्ड

 • उत्पन्न प्रमाणपत्र

 •  पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

 • ई – मेल आयडी

 • जमिनीचा ७/१२ उतारा,स्थावर जंगम मालमत्ता धारकाचे मूल्यांकन / PR Card / नमुना – ८ अ मूल्यांक देण्यात येणाऱ्या कर्ज रक्कमेपेक्षा जास्त असला पाहिजे. हायपोथिकेशन डिड,नोंदणीकृत गहाणखत,शुअरीटी बॉंड,जनरल करारनामा,रक्कम पोचपावती,वचनचिट्ठी

बँकेकडून कर्ज घेण्यास लागणारी कागदपत्रे

 • आधार कार्ड

 • शिधापत्रिका

 • वीज बिल

 • व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना

 • बँक खाते विवरण

 • सिबिल अहवाल

 • व्यवसाय-प्रकल्प अहवाल

 • व्यवसायातील प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

व्याज परतफेड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

 • बँक कर्ज मंजुरी पत्र

 • व्यवसाय प्रकल्प अहवाल

 • व्यवसाय फोटो

 • बँक स्टेटमेंट

 • व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया

 1. सर्वात आधी अर्जदाराला महाराष्ट्र सरकारच्या संबंधित विभागाच्या वेबसाइटला जावे लागेल.

 2. आता मुख्यपृष्ठावरील नोंदणीवर क्लिक करा.

 3. आता नवीन नोंदणीसाठी तुम्हाला माहिती भरावी लागेल,, सर्व माहिती काळजीपुर्वक  भरल्यानंतर आता पुढील या बटणावर क्लिक करा.

 4. लॉगिन करण्यासाठी तुम्हाला वापरकर्तानाव आणि पासवर्डदेण्यात येईल.

 5. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Apply बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल आणि नंतर Apply वर क्लिक करावे लागेल.

 6. आता तुम्हाला तुमची स्व : ताची माहिती दिसेल.

 7. आता तुम्हाला तुमचा ग्रुप/कंपनीचा तपशील द्यावा लागेल

 8. आता आवश्यक कागदपत्रे अपलोड तुम्हाला करावी लागतील

 9. अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करा

 10. अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.

 

admin
adminhttps://techallsearch.com
नमस्कार मित्रानो तुम्हा सर्वांचे Techallsearch ब्लॉग मध्ये स्वागत आहे, या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व टेक विषयी माहिती, ऑनलाईन जगातील गोष्टी, ऑनलाइन कामे कश्या प्रकारे कारवीत, व ऑनलाइन पैसे कमवण्याचे संबंधीत सर्व माहिती पाहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read