pmkisan.gov.in, पीएम किसान सन्मान निधीची रक्कम ई-केवायसीशिवाय मिळणार नाही, जाणून घ्या ताजे अपडेट
Pmkisan.gov.in : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची टप्याटप्याने आर्थिक मदत म्हणून दिली जाते. दर 4 महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये करून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते. १३ हप्त आजपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. 14 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांनी आजवर वात बघितली आहे ताज्या अपडेटनुसार, जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजारांची रक्कम पाठवली जाऊ शकते.
तुम्हाला पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळेल की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान पोर्टल pmkisan.gov.in वर जावे लागेल. येथे तुम्हाला ‘लाभार्थी स्थिती’ हा पर्याय मिळेल नंतर तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक येथे टाका. त्यानंतर तुम्हाला येथे स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड टाकावा लागेल आणि सबमिट वर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला तुमची स्थिती स्क्रीनवर दिसेल. स्टेटस दिसताच, e-KYC, पात्रता आणि जमीन साईडिंगच्या पुढे लिहिलेला संदेश पहा. सर्व तिघांना ‘हो’ म्हटल्यास या हप्त्याचा लाभ भेटू शकतो. या तिघांच्या पुढे किंवा यापैकी कोणाच्याही समोर ‘नाही’ लिहिले तर पुढील हप्त्याच्या लाभापासून वंचित राहता येईल
शेतकऱ्यांनी हे लक्षात घ्यावे की eKYC मध्ये अपडेट आधार-आधारित OTP प्रमाणीकरण सुविधेद्वारे केले जाते. तात्पुरते निलंबित केलेले आधार-आधारित OTP प्रमाणीकरण आता अधिकृत PM किसान पोर्टलवर पुनर्संचयित केले गेले आहे.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जर शेतकरी कोणत्याही कारणास्तव ई-केवायसी करू शकले नाहीत, तर ते पुढील हप्त्यापासून वंचित राहू शकतात.तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई-केवयासी पूर्ण करू शकता. त्याच वेळी, शेतकरी सीएससी केंद्राला भेट देऊन ही प्रक्रिया ऑफलाइन पूर्ण करू शकतात.
अशा शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल
नोंदणीकृत जमिनीवर शेती करून उपजीविका करणारे शेतकरीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय जो शेतकरी सरकारी नोकरी करत नाही आणि आयकर भरत नाही तोही या योजनेसाठी अर्ज करू शकतो. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला जावे लागेल आणि तिथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी जावे लागेल.शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसाठी हे आवश्यक आहे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे काय?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना कृषी आणि संबंधित निविष्ठांसाठी तसेच घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पन्न समर्थन देण्यासाठी सुरू करण्यात आली.
लक्ष्यित लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित करण्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी या योजनेअंतर्गत भारत सरकार उचलेल.
लाभार्थी यादीतील नाव कसे तपासावे
PM किसान आधार OTP-आधारित eKYC कसे करावे
पायरी 1: पीएम किसान वेबसाइटला भेट द्या
पायरी 2: शेतकऱ्यांसाठी तुम्हाला एक कोपरा दिसेल त्यात तुम्ही e-KYC यावर क्लिक करा.
पायरी 3: पुढील पृष्ठावर, तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि शोध टॅबला क्लिक करून पुढे जावे लागेल.
4-अंकी OTP नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठवला जाईल
पायरी 4: सबमिट OTP वर क्लिक करा
पायरी 5: आधार येथे प्रविष्ट करून मोबाइल OTP देखील टाका
यशस्वी पडताळणीनंतर, eKYC पूर्ण होईल.